आमच्याबद्दल
नो युवर फिश (KYF) हा एक स्वयंसेवी उपक्रम आहे जो समुद्री परिसंस्थेला अनुकूल अशा जीवनशैलीच्या प्रसारासाठी कार्यरत आहे. आम्ही मासे खाणाऱ्या खवैय्यांना जबाबदारीने मासे खाण्यासाठी सक्षम करतो आणि अशी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी उद्युक्त करतो. जबाब्दारीपूर्वक मासे खाण्याची सर्व आवश्यक माहिती मिळविण्यासाठी आम्ही अनेक दशकांच्या सागरी संशोधन संकलित केले आहे .
अतिरिक्त मच्छिमारीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेकआघाड्यांवरून प्रयत्न आवश्यक आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये KYF सारख्या उपक्रमाला सुद्धा विशेष स्थान आहे. असे उपक्रम लोकांना सागरी परिसंस्थेबद्दल संवेदनशील बनवू शकतात, सागरी परिसंस्थेसाठी संवेदनशील असा समाज घटक तयार करू शकतात आणि जर बहुसंख्य मासे खाणाऱ्यांनी अशा उपक्रमांचे पालन केले तर ते माशांच्या मागणीवर सुद्धा योग्य परिणाम करू शकतात. तरीही मच्छिमारीच्या धोरणांमध्ये योग्य बदल करणे, , नियमावली तयार करणे, तंत्रज्ञानात बदल करणे आणि सामाजिक समस्या सोडविणे यांसारखे थेट प्रयत्न होणेही तेवढेच महत्वाचे आहेत. KYF सारखे उपक्रम अशा थेट प्रयत्नांना पर्याय ठरू शकत नाहीत.
KYF हा एक समुद्र, समुद्री जीव आणि समुद्री-मेवा (सी फूड) प्रिय असणाऱ्या संशोधक आणि नागरिकांचा समूह आहे.
आमचे बहुतांश काम आणि विचारसरणी खालील दिलेल्या मूल्यांशी संलग्न आहे.
१. मानवेतर जीवांचे संवर्धन हे एक महत्त्वाचे सामाजिक ध्येय असले पाहिजे
२. मानवेतर जीवांचे संवर्धन प्रभावीपणे करण्यासाठी अशा प्रकारचे संवर्धनाला आपल्या प्रत्येकाच्या जीवनशैलीचा घटक असला पाहिजे. असा दृष्टीकोन मानवी आणि मानवेतर जीवांच्या कल्याणासाठी सर्वात अनुकूल परिस्थिती निर्माण करतो.
३. मानवेतर जीवांच्या संवर्धनाला मूल्य म्हणून महत्त्व देणारे आणि विज्ञानासारख्या साधनांचा वापर करणारे नागरिक या नात्याने, ही माहिती प्रत्येकाला सर्वात सुलभ स्वरूपात उपलब्ध करून देणे ही आम्ही आमची जबाबदारी मानतो.
१. बौद्धिक आणि प्रक्रियात्मक स्वातंत्र्य टिकवून ठेवणे - आम्ही आमच्या देणगीदारांच्या किंवा आमच्या भागीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे मूळ तत्वज्ञान आणि धोरणे बदलत नाही
२. टीका स्वीकारणे - एक संघ म्हणून आम्ही कोणाच्याही टीकांसाठी आणि सूचनांसाठी खुले आहोत. आम्ही आमच्या क्षमतेनुसार आणि ज्ञानानुसार सर्व टिप्पण्या आणि सूचनांना संबोधित करू.
३. संवादातील पारदर्शकता- आमचा सर्व डेटा आणि आमच्या शिफारसींमध्ये वापरलेली कारणे नेहमीच छाननीसाठी सार्वजनिक व्यासपीठावर उपलब्ध असतील
४. प्रामाणिकपणा- आम्ही आमच्या माहितीनुसार मासे आणि मासेमारीवर भाष्य करतो. सागरी संवर्धन आणि मासेमारीसंदर्भात आम्ही अतिशयोक्ती करणे टाळतो.
५. आम्ही आमच्या अपयशांबद्दल पारदर्शक आहोत आणि त्यांच्याकडून सतत शिकण्याचा प्रयत्न करतो.
“हि आमची टीम” असे सांगणे जरा कठीण आहे. कारण आम्ही ज्या कोणी आमच्याबद्दल ऐकले आणि ज्या कुठल्या प्रकारची मदत देऊ केली ती घेतली आहे. येथे आम्ही काही व्यक्ती आणि संस्था सूचीबद्ध केल्या आहेत ज्यांनी आपले मासे जाणून घेणे शक्य करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.