top of page

आम्ही कॅलेंडर कसे बनविले

आम्ही हे कॅलेंडर बनविण्यासाठी प्रामुख्याने दोन निकषांचा आधार घेतला 

 

१. आपण खाण्यासाठी निवडलेल्या मास्याचा जर विणीचा हंगाम चालू असेल तर तो मासा खाणे टाळले पाहिजे 

२. आपण खाण्यासाठी निवडलेल्या मास्याबरोबर जे इतर मासे  पकडले जातात त्यांचा विणीचा हंगाम चालू असेल तर आपण निवडलेला मासा खाणे टाळले पाहिजे

इतर प्राणिमात्रांप्रमाणेच माशांसाठी सुद्धा विणीचा हंगाम अत्यंत महत्वाचा असतो. विणीच्या हंगामात प्रौढ मासे अंडी घालतात, पिल्लाना जन्म देतात. विणीच्या हंगामात माशांना सुरक्षिततेची गरज सगळ्यात जास्त असते. ह्याच हंगामात जर मासेमारी झाली तर माशांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

 

आम्हाला असे कॅलेंडर बनवायचे होते कि ज्याचे अनुसरण केल्यामुळे माशांच्या संख्येवर कमीत कमी परिणाम होईल. त्यासाठी आम्ही खालील गोष्टींची खबरदारी घेतली.

अ)

कुठलाही मासा त्याच्या विणीच्या हंगामात कमीत कमी पकडला जावा

ब)

त्या माशाला बाजारातून येणारी जी मागणी आहे ती विणीच्या हंगामात कमीत कमी असावी

क)

ज्या माशांचा विणीचा हंगाम आहे ते मासे खाणे टाळले पाहिजे

आपण सुरमईचे उदाहरण घेऊया

Kingfish.png

सुरमाईचा विणीचा हंगाम प्रामुख्याने  मार्च, एप्रिल आणि मे हा आहे. म्हणजेच ह्या महिन्यांमध्ये आपण सुरमई खाणे टाळले पाहिजे.

No fish.png

Avoid Months:

Mar, Apr, May

पण एवढे करणे पुरेसे होईल का ?

सुरमई हा मासा प्रामुख्याने न्हईच्या जाळ्यात (मोठ्या गिल - नेट ) मध्ये पकडला जातो. ह्या जाळ्यामध्ये करली, बोडाव, मोडुसा, गोब्रा, मुशी, अबनूस, जिताडा, गेदर, शिंगाडा असे इतर मासेही पकडले जातात. ह्या माशांचे विणीचे हंगाम सुरमईच्या विणीच्या हंगामापेक्षा वेगळे असू शकतात.

Large Gillnet, Hook and Line

Dominant Gear Type:

त्यामुळे जर  मार्च, एप्रिल आणि मे ह्या महिन्यांखेरीज इतर महिन्यांमध्ये जर आपण सुरमई खाल्ली तर सुरमईच्या उत्पत्ती वर विपरीत परिणाम होणार नाही पण सुरमई बरोबर जे इतर मासे पकडले जातात ह्यांच्या उत्पत्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

म्हणून सुरमाईखेरीज जे इतर मासे न्हईच्या जाळ्यांमध्ये पकडले जातात त्यांच्या विणीच्या हंगामातही सुरमई खाणे टाळले पाहिजे. सुरमई बरोबर पकडले जाणारे बहुतांश मासे जानेवारी ते मे ह्या महिन्यांमध्ये अंडी घालतात, आणि कर्ली ऑक्टोबर महिन्यामध्ये अंडी घालते.

No fish.png

Avoid Months:

Mar, Apr, May, Jan, Feb, Oct

तर सुरमाईचे आणि त्याबरोबर पकडल्या जाणाऱ्या इतर  माशांच्या विणीच्या हंगामांना ध्यानात ठेवून आमचे कॅलेंडर असे सुचवते कि सुरमई खाण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे जून ते सप्टेंबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने.

Preferred Months:

Jun, Jul, Aug, Sep, Nov, Dec

ग्राहकांच्या निवडीचा एकूण मच्छीमारीवर होणार परिणाम अधोरेखित हरणारा एक माहितीपट स्क्रोल.इन या नियतकालिकाने प्रदर्शित केला आहे. हा  माहितीपट आपण येथे पाहू शकता.

सुरमईच्या उदाहरणाप्रमाणेच इतर माशांसाठी सुद्धा आम्ही हिच प्रक्रिया वापरून कॅलेंडर तयार केली केले

तुम्ही जर आमच्या कॅलेंडर बाबतीत तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी उत्सुक असाल तर ह्या लिंक वर क्लिक करा  

 

ह्यात आम्ही कॅलेंडर मधील प्रत्येक माशांसाठी वापरलेले सगळे संदर्भ, आणि प्रक्रिया तपशीलवार नमूद केले आहेत. ते बघताना जर तुम्हाला काही सुधारणा सुचल्या, चुका आढळून आल्या किव्हा आम्हाला काही टिप्पण्या  कराव्याश्या वाटल्या तर आम्हाला ह्या email वर जरूर लिहा.

Open-Access-logo.jpg
bottom of page